TDC Bank chairman election pudhari photo
ठाणे

TDC Bank chairman election : जिल्हा बँकेत सरशी कोणाची भाजप की बविआ? याकडे लक्ष

अध्यक्ष महायुतीचा होणार की सहकार पॅनेलचा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी होत असून, या निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केल्याप्रमाणे महायुतीचा अध्यक्ष होणार की, शिवसेना बहुजन विकास आघाडीच्या सहकार पॅनेलचा विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनल विरुद्ध सहकार पॅनल अशी लढत झाली होती. या लढतीमध्ये सहकार पॅनल 16 जागा तर परिवर्तन पॅनलला पाच जागा मिळाल्या. मात्र, निवडणुकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचे 13 उमेदवार विजयी झाल्याचे जाहीर करताना भाजपचे 8 आणि शिवसेनेचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत.

त्यामुळे जिल्हा बँकेचा अध्यक्ष महायुतीचाच होईल, असे स्पष्ट केले होते. मात्र शिवसेनेने बहुजन विकास आघाडी आमदार किसन कथोरे आणि शिवसेना यांचे एकत्रित परिवर्तन पॅनल विजय झाले आहे. त्यामुळे त्यांचाच अध्यक्ष होईल असे सांगितले होते. मात्र सध्या अध्यक्षपदासाठी चुरस आहे.

सहकार पॅनेलमध्ये शिवसेना-भाजप आणि बहुजन विकास आघाडी असे संचालक निवडून आले आहेत. याच सहकार पॅनलमध्ये भाजपचे किसन कथोरे ही सहभागी होते. तर परिवर्तन पॅनलमध्ये कपिल पाटील यांनी आपले उमेदवार उभे केले होते.

भाजपचे पाच उमेदवार यापैकी भाजपचे पाच उमेदवार विजयी झाले. तर किसन कथोरे यांचे तीन उमेदवार विजयी झाले. त्यामुळे भाजपचे संख्याबळ आठ आहे. बहुजन विकास आघाडीने आपले आठ उमेदवार निवडून आणले आहेत. तर शिवसेनेचे पाच उमेदवार निवडून आणले आहेत.

पक्षीय विचार केल्यास महायुतीचे बहुमत आहे, पण पॅनलचा विचार केला तर सहकार पॅनल बहुमतात आहे. त्यामुळे अध्यक्ष करताना अशाप्रकारे जुळवाजुळव होणार यावर अध्यक्ष कोण हे ठरणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांची गोळा बेरीज सुरू आहे. त्यामुळे उद्याची निवडणूक उत्कंठावर्धक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT