ठाणे : राज्याच्या रविवारी (दि.15) शपथविधी झालेल्या मंत्रीमंडळात कोकणच्या सात चेहर्यांना संधी मिळाली असून यामध्ये मुंबईचे 2 ठाणे 2, रत्नागिरी 2 , रायगड 2 आणि सिंधुदुर्ग 1 अशा आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.सातपैकी सहा कॅबिनेटमंत्री झाले असून,एक आमदार राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. उदय सामंत, मंगलप्रभात लोढा, आदिती तटकरे यांना पुन्हा संधी मिळाली असून 6 नवे चेहरे मंत्रिमंडळात दाखल झाले आहेत.
नव्या चेहर्यांमध्ये ठाण्यातून प्रताप सरनाईक रायगडमधून भरत गोगावले, रत्नागिरीतून योगेश कदम या तिन आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली यात दोन कॅबिनेट तर एक राज्यमंत्री आहेत. भाजपाने कोकणातून चौघांना संधी दिली आहे. यामध्ये सिंधुदुर्गमधून नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे कॅबिनेट मंत्री झाले आहेत. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्याची भरपाई भाजपाने मुलाच्या मंत्रिपदातून करून दिली आहे. तर मुंबईमधून भाजपाचे अध्यक्ष असलेले आशिष शेलार दुसर्यांदा मंत्री झाले आहेत. यापुर्वी फडणवीस सरकारमध्ये 2014 मध्ये ते काही काळ मंत्री होते. ते आता पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले आहेत. तर मंगलप्रभात लोढा यांना पुन्हा संधी मिळाली आहे. भाजपात जाऊन मंत्रिपदासाठी बराच काळ प्रतिक्षेत असलेले माजी मंत्री आणि ऐरोलीतून विजयी झालेले भाजपाचे आमदार गणेश नाईक यांना पुन्हा एकदा भाजपाने कॅबिनेटमंत्री म्हणून संधी दिली आहे.
भाजपाने तिन बुजुर्ग नेत्यांना एक तरुण चेहरा कोकणातून दिला आहे. शिवसेनेेेनही तिन नवीन चेहरे तर उदय सामंत यांना पुन्हा संधी देणे पसंत केले. वगळलेल्या चेहर्यांमध्ये शिक्षणमंत्री राहिलेले दिपक केसरकर बाहेर गेले आहेत. तर दुसर्या बाजुला पालघर जिल्ह्याला या मंत्रीमंडळातून बाहेर रहावे लागले आहे. भाजापाचे रविंंद्र चव्हाण हे आश्चर्यकारकरित्या मंत्रिमंडळाच्या बाहेर राहिेले आहे. त्यांना प्रदेशाध्यक्ष पद देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. महायुती सरकार राज्यात मोठे बहुमत घेवून प्रस्थापित झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी मुंबईतील आझाद मैदानात करण्यात आला होता. आता रखडलेला मंत्रिमंडळ विस्तारही नागपूरात झाला असून 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.त्यामुळे मुख्यंत्र्यासह एकूण आता 42 मंत्री झाले आहेत.
मतदारसंघ : 146 ओवळा-माजिवडा
जन्म तारीख : 25 एप्रिल , 1964
ठिकाण - वर्धा राजकीय
भूषवलेले पदे अशी....
1995 : विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकीय प्रवासाला सुरुवात
1996 : ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळ सदस्यपदी निवड
1992 ते 1997 ठाणे परिवहन समिती सदस्य
1997 ते 2008 सलग तीन वेळा ठाणे महापालिका नगरसेवक
2008 : नंतर राष्ट्रवादीला राम राम ठोकून शिवसेनेत प्रवेश
2009 : एम.एम.आर.डी.ए. सदस्य पदी निवड
2009 : ओवळा-माजिवडा मतदार संघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडणूक गेले
2014 : याच मतदार सांघातून दुसर्यांदा निवडणून गेले
2014 : शिवसेना पक्षाच्या मिरा -भाईंदर संपर्क प्रमुख पदी निवड
2019 : तिसर्यांदा याच मतदार संघातून निवडणून गेले
2020 : शिवसेना प्रवक्ते पदी निवड
2024 : ओवळा-माजिवडा मतदार संघातून चौथ्यांदा विजयीआता महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेकडून मंत्री पदी वर्णी
दोन वेळा मंत्री पद हुकलेल्या ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची अखेर महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री पदी वर्णी लागली आहे. सरनाईक हे ओवळा माजिवडा मतदार संघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून गेले असून नुकत्याच झालेल्या विधान सभा निवडणुकीत त्यांना एक लाखांच्या वर मताधिक्य मिळाले होते. मूळचे वर्धा जिल्ह्याचे असलेले प्रताप सरनाईक हे गेले तीन वर्ष ओवळा माजिवडा मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. तर यावेळी देखील याच मतदार संघातून चौथ्यांदा ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. 2008 साली त्यांनी राष्ट्ट्रवादीला राम राम ठोकून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने सोबत गेले. आणि शिंदेच्याच शिवसेनेतून त्यांची आता महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून अखेर मंत्रीपदी वर्णी लागली आहे.