पाणी शुद्धीकरण Pudhari News network
ठाणे

Thane News | पाणी शुद्धीकरणाच्या संशोधनाला यूके सरकारचे पेटंट

पर्यावरणपूरक सोलर प्रकाशात कार्यशील नॅनोकम्पोझिट

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : विल्सन महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. अभिजित नानासो कदम आणि प्रा. हरिचंद्र अंबरुषी परबत व त्यांचे सहकारी डॉ. दत्तात्रय पवार, डॉ. भिमराव पाटील (होमी बाबा स्टेट विद्यापीठ आणि डॉ. मुकुंद माळी (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) यांनी पर्यावरणपूरक सोलर प्रकाशात कार्यशील नॅनोकम्पोझिट अत्यंत सोप्या पद्धतीने तयार करून त्यांचा वापर उत्प्रेरक म्हणून केला. याअंतर्गत पर्यावरणाला हानिकारक असणारी रंगद्रव्ये पूर्णपणे नष्ट करून पाणी शुद्धीकरण तयार करणे शक्य. ही प्रक्रिया फारशी खर्चिक नसल्याने वस्त्रोद्योगांसाठी एक प्रकारे वरदानच ठरणार आहे. संदर्भातील संशोधन साकारले आहे. यांना त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी यूकेचे प्रतिष्ठित पेटंट प्रदान करण्यात आले.

डॉ. कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, वस्त्रोद्योगांसह सर्वच उद्योगांत रसायने आणि नैसर्गिक संसाधनांचा व्यापक वापर केला जातो. कारखान्यातून बाहेर पडणार्‍या औद्योगिक सांडपाण्यामध्ये नैसर्गिकदृष्ट्या नष्ट न होऊ शकणारे अजैविक, रासायनिक सेंद्रिय घटक असतात. ते कित्येकदा कोणत्याही प्रक्रियेविना थेट नद्या, नाले आणि समुद्रात सोडले जातात. त्यामुळे जलप्रदूषणाची समस्या ही जागतिक पातळीवर एक डोकेदुखी होऊन बसली आहे. या प्रकारचे जलप्रदूषण टाळण्यासाठी औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करून पुनर्वापरायोग्य करणे आवश्यक आहे. औद्योगिक सांडपाणी शुद्ध करण्यासाठी नॅनोमटेरियल फोटोकॅटॅलिस्ट हा एक प्रभावी आणि आर्थिकदृष्टया किफायतशीर पर्याय आहे. त्या दिशेने संशोधनाची दिशा केंद्रित करून सूर्यप्रकाशात रंगद्रव्यांवर प्रक्रिया करण्याची पद्धती शोधून काढण्यात यश आले. भविष्यात देखील सोप्या हरित पद्धतीने आणि सूर्यप्रकाशात काम करणारे आणखी क्रियाशील नॅनोमटेरियल फोटोकॅटलिस्ट तयार करून पर्यावरणाची हानी टाळण्याच्या दृष्टीनेही संशोधन करण्यात येत आहे.

डॉ. कदम आणि त्यांचे सहकारी यांचे कार्य गंभीर पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी सौर ऊर्जेसह अत्याधुनिक नॅनो तंत्रज्ञानाची क्षमता दर्शविते. त्यांच्या संशोधनाने केवळ आंतरराष्ट्रीय मान्यताच मिळवली नाही तर समाजाला लाभदायक परिणामकारक संशोधनाला चालना देण्यासाठी बांधिलकी देखील अधोरेखित केली आहे. या सर्व संशोधकांचे छत्रपती उच्च शिक्षण बौद्धिक मंचावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT