कल्याण : कल्याण पूर्वतील नेतीवली टेकडीवर सतत पडणाऱ्या पावसामुळे घरे कोसळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (दि.१८) रोजी नेतीवली टेकडी येथील तीन घरे शेजारी असलेल्या दोन घरांवर कोसळली आहेत.
चारही घरातील कुटुंबातील सदस्य बाहेर असल्याने जीवितहानी टळली. या घटनेत घरांचे मोठं नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तीन दिवसांपूर्वी या परिसराला लागून असलेल्या कचोरे टेकडीवर दरड कोसळल्याची घटना घडली. होती. गुरुवारी (दि.१८) रोजी दुपारच्या सुमारास घर कोसळण्याच्या घटनेत सुरेश भोसले यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. घराच्या मागच्या भिंतीला मोठे भगदाड पडले असून घरावरील पत्रे देखील फुटले असून ते कामाला गेले होते. त्यांची पत्नी व मुलगा घरा मध्ये होते. त्यांची पत्नी मंगला हिच्या पायास या घटनेत दुखापत झाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य केले.