मारहाण Pudhari Photo
ठाणे

Thane News | कल्याणमध्ये खासगी सावकाराच्या हस्तकांची मोबाईल व्यावसायिकाला मारहाण

खडकपाडा पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावर असलेल्या आंबिवली स्टेशनजवळच्या वडवली गावातील एका मोबाईल व्यावसायिकाने कल्याण पश्चिमेतील बैलबाजार (भोईवाडा) भागातील एका खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. या व्याजाने घेतलेल्या पैशांचे नियमित हप्ते मोबाईल व्यावसायिकाने फेडले नाहीत म्हणून खासगी सावकाराच्या चार हस्तकांनी मिळून व्यावसायिकाला हाॅकी स्टिक, कमरेचा पट्टा आणि वायरच्या साह्याने बेदम मारहाण केली. या प्रकरणी मोबाईल व्यावसायिकाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

घटना घडलेले ठिकाण खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने बाजरपेठ पोलिसांनी हा गुन्हा खडकपाडा पोलिसांकडे ठाण्यात वर्ग केला आहे. राजू शिवजनम कहार (३८, रा. बिस्तुरी टाॅवर, आंबिवली, वडवली) असे तक्रारदार मोबाईल व्यावसायिकाचे नाव आहे. तर ओमकार भोपी, रोहन आणि दोन अनोळखी इसमांनी राजू कहार मारहाण केली आहे. पोलिसांनी खासगी सावकार कपील भोपी (रा. बैलबाजार, भोईवाडा, कल्याण पश्चिम) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

मोबाईल व्यावसायिक राजू कहार यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की कपील भोपी याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. घेतलेल्या पैशाचे हप्ते नियमित फेडले नाहीत म्हणून ओमकार भोपी, रोहन आणि त्यांचे दोन साथीदार शुक्रवारी दुपारी राहत असलेल्या आंबिवली (वडवली) येथील घरातून बाहेर बोलविले. चारही जणांनी जबरदस्तीने एका दुचाकीवर बसवले. खासगी सावकार कपील भोपी याच्या बैलबाजार येथील कार्यालयात आणले. तेथे व्याजाचे हप्ते नियमित फेडले नाहीत म्हणून राजू कहार यांना ओमकार, रोहन आणि त्याच्या दोन साथीदारांनी हाॅकी स्टीक, कमरेचा पट्टा आणि वायरने मारहाण केली. चार तास कार्यालयातील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. यावेळी खासगी सावकार कपील याने व्यावसायिकाला शिवीगाळ केली. त्यामुळे मोबाईल व्यावसायिक राजू कहार यांनी पाच जणांच्या विरुध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT