पालघर : शिर्डी येथे पार पडलेल्या 19 व्या राष्ट्रीय एरोबिक्स स्पर्धेत पालघरची आर्या गुंजाळ हिने महाराष्ट्र संघाकडून खेळताना रौप्य पदकाची कमाई केली आहे. देशातील 19 राज्यांचे संघ या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. 19 वी ISAFF यांच्या राष्ट्रीय स्पर्धेतील आर्या गुंजाळ हिच्या कामगिरीचे पालघर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.
29 नोव्हेंबर ते 1डिसेंबर 2024 कालावधीत 19 वी राष्ट्रीय एरोबिक्स हिपोप चॅम्पियनशिप स्पर्धा सिल्वर ओक लॉन्स, शिर्डी अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 19 राज्यातील संघांनी या स्पर्धेत सहभागी नोंदवला होता. त्यात यजमान महाराष्ट्र सोबत कर्नाटक तामिळनाडू तेलंगणा पंजाब राजस्थान दिल्ली, गोवा गुजरात हिमाचल प्रदेश हरियाणा मध्य प्रदेश आसाम केरळा झारखंड जम्मू-काश्मीर मिझोरमन मणिपूर या राज्यातील एकूण 856 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
ही स्पर्धा सब ज्युनिअर कॅडेट सीनियर, मुले व मुली, महिला व पुरुषाच्या वयोगटात घेण्यात आल्या. या स्पर्धेत स्पोर्ट्स एरोबिक्स फिटनेस एरोबिक्स स्टेप एरोबिक्स हिपहॉप एरोबिक्स ग्रुप या विविध प्रकारात घेण्यात आला. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ संतोष देशमुख अध्यक्ष एशियन एरोबिक्स फिटनेस फेडरेशन यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राकडून खेळताना आर्या गुंजाळ हिच्या संघाने फिटनेस एरोबिक क्रीडा प्रकारात रोप्य पदक पटकावले आहे. महाराष्ट्राचा दुसरा संघ यात विजेता ठरला तर कर्नाटक तृतीय स्थानी राहिला. या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद महाराष्ट्र ने पटकावले तर कर्नाटक दुसर्या तर तेलंगणा तिसर्या स्थानावर ती राहिला. या स्पर्धेतून भारताचा 18 ते 21 मे रोजी बँक ऑफ थायलंड येथे होणार्या युरो एशिया एरोबिक्स स्पर्धेसाठी संघ निवडला जाणार आहे. आर्या गुंजाळ हिला तिचे प्रशिक्षक कुलदीपक कागडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आर्या गुंजाळ हिला तिच्या वडिलांकडून क्रीडा क्षेत्राचा वारसा लाभलेला आहे. ते राष्ट्रीय पंच असून त्यांनी अनेक स्पर्धेत पालघर चे नाव उज्ज्वल केले होते. तोच वारसा आर्याच्या रूपाने पुढे चालवण्याला सुरवात झाली आहे आहे असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी व्यक्त केले.