ठाणे

Thane News | वसईत 385 अनधिकृत होर्डिंग्जवर हातोडा

पुढारी वृत्तसेवा

विरार : वसई विरार शहर महानगरपालिकेने तीन महिन्यात 387 अनधिकृत होल्डिंग जमीनदोस्त केले आहेत तर केलेल्या कारवाईनंतर पालिकेने 11 लाख 39 हजाराचा दंड देखील वसूल केला आहे यामुळे पालिकेने केलेली कारवाई ही तीन महिन्यातीली सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे.

वसई विरार महानगरपालिका हद्दीत मुंबईच्या घाटकोपरसारखी होर्डिंग्ज दुर्घटना घडून सर्व सामान्य लोकांचा जीव जाऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी पालिकेच्या जाहिरात विभागाने 387 होर्डिंग्ज जमीनदोस्त केले आहेत. तसेच शहरातील होर्डिंग्जबाबत स्थैर्य प्रमाणपत्र (स्टॅबिलिटि सर्टिफिकेट) सादर करण्याचे आदेश देऊनही सादर न-केलेल्या होर्डिंग्ज धारकांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

वसई -विरार शहरात गेल्या काही अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात मिळेल त्याठिकाणी राजकीय नेते तसेच जाहिरातदारांकडून जाहिरातीचे फलक लावण्यात येत होते यामुळे शहर बकाल दिसू लागले होते. हे बॅनर रेल्वे स्थानक, पोलिस ठाणे, पालिका कार्यालय, वर्दळीचे ठिकाणी, बस स्थानक, रिक्षा स्थानक, चौक, हॉस्पिटल, मंदिरे, उद्याने, उड्डाणपूल, लाईटचे खांब, आकाश मार्गिका, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना अटकवले जायचे यामुळें शहराला जाहिरातीने जणू विळखा घातला होता.

वसई-विरार शहर महानग पालिकेच्या जाहिरात विभागाने नऊ प्रभागात केलेल्या कारवाईमुळे पालिकेच्या तिजोरीत कमालीची भर पडली आहे यामध्ये राजकीय नेत्याचे बॅनर, मोठे होल्डिंग, वाढदिवसाचे बॅनर, कंपन्यांचे बॅनर यांचा समावेश आहे. पालिकेने तीन महिन्यात 11 लाख 39 हजाराचा दंड वसूल केला आहे तर यामध्ये 387 होल्डिंग जमीनदोस्त केले.

महानगरपालिका क्षेत्रामधील होर्डिंगधारकांना होर्डिंगचे स्ट्रक्चर स्टॅबिलीटी प्रमाणपत्र सादर करणेबाबत शहरातील होर्डिंग्ज धारकांना कळविण्यात आले होते. महाराष्ट्र महानगरपालिका (आकाशचिन्हे (स्काय-साईन) आणि जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण) नियम, 2022 मधील 20 (ख) मधील नमूद तरतुदींच्या अधिन राहून आयुक्त अनिलकुमार पवार तसेच अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे मार्गदर्शनानुसार जाहिरात धारकांच्या होर्डिंगवर कारवाई केल्याचे जाहिरात विभागाच्या उपआयुक्त विशाखा मोडगरे यांनी सांगितले. दरम्यान या कारवाईने वसईकर समाधान व्यक्त करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT