Dombivli Fish Market
जुन्या फिश मार्केटची जागा खाली करण्यासाठी पालिका प्रशासनाने मंगळवारी (दि.२३) रोजी जुने फिश मार्केट निष्कासित केले. pudhari news network
ठाणे

Thane News | डोंबिवलीकरांना लवकरच अद्ययावत फिश मार्केट मिळणार

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : डोंबिवली पश्चिमेकडील नागरिकांना जुन्या फिश मार्केटच्या जागी अद्ययावत फिश मार्केटची इमारत उभारण्याच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. तत्पूर्वी या जुन्या फिश मार्केटची जागा खाली करण्यासाठी पालिका प्रशासनाने मंगळवारी (दि.२३) रोजी जुने फिश मार्केट निष्कासित करून या मार्केटमधील मच्छीविक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात बाजूकडील जागेत शेड उभारून जागा देण्यात आली आहे.

दरम्यान नवीन फिश मार्केटचे काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या जागेत मच्छी विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. डोंबिवली शहरातील पश्चिमेकडील स्टेशन समोर गेल्या तीस वर्षांहून अधिक जुने फिश मार्केट आहे. या मार्केटच्या जागी अद्ययावत फिश मार्केट उपलब्ध करून देण्यात यावे अशी येथील नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी होती. मंगळवारी (दि.२३) रोजी पालिका प्रशासनाने जुन्या फिश मार्केटची जागा जेसीबीच्या सहाय्याने निष्कासित केली. याबाबत माहिती देताना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे म्हणाले, डोंबिवलीतील सर्वात जुने फिश मार्केट पालिका प्रशासनाकडून जमीनदोस्त करण्यात आले. या जागेवरच अत्यंत सुज्जज आणि अत्याधुनिक असे फिश मार्केट उभारले जाणार आहे. हे नवीन फिश मार्केटचे काम लवकरच पूर्ण होईल.

असे असेल नवीन नवीन फिश मार्केट...

जुन्या फिश मार्केटच्या जागी नव्याने मच्छी मार्केटची तळ अधिक दोन मजल्याची इमारत उभारण्यात येणार असून तळ मजल्यावर रस्ता रुंदीकरणाचे 12 गाळे धारक तसेच 21 मासळी तर स्वच्छता गृह लिफ्ट आणि जिना प्रस्तावित असून पहिल्या मजल्यावर 39 मच्छी आणि 10 मटण विक्रेत्यांचे गाळे, शीत गृह आणि शौचालय प्रस्तावित करण्यात आले आहे तर दुसर्‍या मजल्यावर 47 मच्छी विक्रेते शीतगृह व स्वछता गृह तसेच रेल्वेच्या पादचारी पुलावरून थेट मार्केटमध्ये पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे

SCROLL FOR NEXT