बहुमजली इमारतीवर पाडकमाची कारवाई  Pudhari News network
ठाणे

Thane News | डोंबिवलीमध्ये रस्त्यात बाधित बहूमजली इमारतीवर बुलडोझर

बहुमजली इमारतीवर पाडकमाची कारवाई; निष्कासनाची कारवाई सुरु

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिच्या 10 / ई प्रभागातील रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या बहुमजली इमारतीवर पाडकमाची कारवाई करण्यात आली. सदर इमारत हटविल्यामुळे स्टार कॉलनी ते समर्थ चौक रस्त्याचे लवकरच रुंदीकरण होणार आहे.

महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड व अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्या निर्देशांनुसार अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधुत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली 10/ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी डोंबिवली पूर्वेकडील स्टार कॉलनी ते समर्थ चौक या 24.00 मीटर रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या ओम रेसिडेन्सी या तळ + 4 मजली इमारतीच्या बांधकामावर मंगळवारी (दि.10) रोजी निष्कासनाची कारवाई सुरु केली.

सदर इमारतीमधील 16 सदनिकारक आणि 6 गाळेधारकांना नोटीसा देऊन इमारत रिकामी करण्यात आली होती. त्यानंतर सदर इमारतीवर पाडकामाची कारवाई करणे सुकर झाले. ही कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या बंदोबस्तात हाय जॉ क्रश मशीन, 1 पोकलेन आणि 10 मजूरांच्या साह्याने करण्यात आली. ही कारवाई सदर इमारत पूर्ण भुई सपाट होईपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती 10 / ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT