कल्याण (ठाणे) : कल्याणातील कोळसेवाडी परिसरातील श्री सप्तशृंगी व ऑफ हाउसिंग सोसायटीच्या इमारतीचा चौथ्या मजल्यापासून ग्राउंड फ्लोअर पर्यंत स्लॅप कोसळल्यामुळे अनेक जण जखमी झाले असून एक 75 वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच कल्याण अग्निशामक दलाचे अधिकारी आणि कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुढील बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाकडून ढिगाऱ्यात अडकलेल्या व्यक्तींचा शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.