ठाणे आयुक्तालयाच्या 1207 शाळा पोलिसांच्या निगराणीत  Pudhari News Network
ठाणे

Badlapur School Case Update | ठाणे आयुक्तालयाच्या 1207 शाळा पोलिसांच्या निगराणीत

Thane News | बदलापूर घटनेने ठाणे पोलीस सतर्क

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : बदलापूर मध्ये अल्पवयीन मुलींवर घडलेल्या निंदणीय घटनेपासून शाळकरी मुले मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करीत जनजागृती आणि लोकसह्भागावर भर दिला आहे. आणि शाळा पोलिसांच्या निगराणी खाली आणल्या असल्याची माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी एका परिसंवादात बोलताना दिली.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल 1 हजार 207 मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. या शांमध्ये मुले आणि मुली शिक्षण घेत असल्याने त्यांच्या सुरक्षेची अप्रत्यक्षपणे जबाबदारी ही ठाणे पोलीस आयुक्तांनी स्वीकारली आणि बदलापूरचे घटना शमल्यानानंतर प्रत्येक शाळा हि पोलिसांच्या निगराणी खाली आणलेल्या आहेत. प्रत्येक शाळेवर आणि शाळेतील घडामोडी यावर लक्ष देण्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेली आहे.

ठाणे पोलिसांचे जनजागृतीचे 3 हजार विविध कार्यक्रम

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच परिमंडळात ठाणे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या विविध गुन्ह्यात ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शाळकरी मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत अमली पदार्थ, सायबर गुन्हे, स्वसंरक्षण सारख्या विविध विषयांवर जनजागृती कर्णयची विशेष मोहीमच हाती घेऊन तब्बल 3 हजार कर्यक्रम केलेले असून यंदाच्या अभियानाचा आराखडाही तयार असलयाचे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले.

ठाणे पोलिसांना ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद आणि सहकार्य

अगदी तळागाळातील नागरिकांशी संपर्क अबाधित ठेवण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तांनी जनजागृतीच्या माध्यमातून ठाणेकरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. ठाणे पोलिसांनि सर्वसामान्यांशी संवाद साधण्यासाठी पोलीस मित्र सारखी संकल्पना राबविलेली आहे. तर ठाणेकरांनी ठाणे पोलिसांना मात्र चांगलेच सहकार्य केल्याची कबुली परिसंवादाच्या कार्यक्रमात दिली. ठाणेकरांनी ठाणे पोलिसांना मोठे सहकार्य करीत असलायचेही स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT