वाढोणा येथील समाजसेवा विद्यालयाच्या कनिष्ठ लिपिकासह एका व्यक्तीला लाच घेतना अटक केली.  Pudhari File Photo
ठाणे

ठाणे महापालिकेतील दोन लाचखोर लिपिक 'एसीबी'च्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : जन्मदाखला देण्यासाठी ४०० रुपयांची लाच घेताना ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीमधील दोन लिपिकांना ठाणे लाचलुचपत विभागाने (एसीबी) बुधवारी (दि.२८) अटक केली. याप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रणजित पांडूरंग मगदूम (४२) आणि निखील मोतीराम कडव (२४) अशी या लाचखोर लिपीकांची नावे आहेत.

तक्रारदार यांनी त्यांच्या नातीचा जन्मदाखला मिळावा, यासाठी दिवा प्रभाग समितीत अर्ज केला होता. त्यानुसार लिपिक रणजित मगदूम यांनी दाखला देण्यासाठी तक्रारदारांकडे ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदारांनी सोमवारी (दि.२६) ठाणे एसीबी कार्यालयात लेखी तक्रार केली. त्यानुसार बुधवारी (दि.२८) पडताळणी कारवाईमध्ये लिपिक रणजित मगदूम यांनी तक्रारदारांकडे लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ४०० रुपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. तसेच ती रक्कम त्यांनी लिपिक निखील कडव यांच्यासाठीही स्विकारल्याचे मान्य केल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उप अधीक्षक प्रगती अडसुरे करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT