Thane Municipal Election Result 2026 Live Updates pudhari photo
ठाणे

Thane Municipal Election Result 2026 : ठाण्यात ठाकरेंचे फक्त खातेच उघडले... शिंदेचे अर्धशतक पार तर भाजपचीही मुसंडी

Thane Municipal Corporation Election Result 2026 Live Update: ठाणे हा एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला म्हणून संबोधला जातो. यंदाच्या निवडणुकीत शिंदे गटानं बिनविरोध नगरसेवक निवडून आणत आधीच आपल खातं उघडलं आहे.

Anirudha Sankpal

Thane Municipal Corporation Election Result 2026

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या गेलेल्या ठाणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंची शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. आतापर्यंत त्यांनी ५५ जागांवर विजय मिळवला असून भाजपने देखील २५ जागांवर विजय मिळवत चांगली मुसंडी मारली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून शरद पवार गटाला ११ तर अजित पवार गटाला ८ जागांवरच विजय मिळवता आला आहे. गेल्या निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादीचा आकडा हा ३४ पर्यंत गेला होता.

६४१ उमेदवार रिंगणात

ठाणे महानगरपालिकेच्या ३३ प्रभागातून १३१ नगरसेवक निवडीसाठी ही निवडणूक झाली. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच एकूण 641 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. शिंदे गटाने आधीच बिनविरोध नगरसेवक निवडून आणत आपलं खातं उघडलं होतं.

गेल्या निवडणुकीत काय झालं होतं?

गेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत १३१ पैकी एकसंध शिवसेनेचे ६७ नगरसेवक निवडून आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३४ नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे २३ उमेदवार विजयी झाले होते. तर काँग्रेसला ३ जागांवर विजय मिळाला होता.

शिवसेना - ६७

राष्ट्रवादी काँग्रेस - ३४

भाजप - २३

काँग्रेस - ३

यंदाच्या निवडणुकीत शिवसेना फुटली आहे अन् बहुतांश माजी नगरसेवक हे शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे इथं शिवसेना उद्धव ठाकरे गट कशी कामगिरी करतो याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यातच यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या कामगिरीकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.

ठाण्यात शिंदेंचे अर्धशतक पार

शिवसेना (शिंदे गट) - ५५

भाजप - २५

राष्ट्रवादी काँग्रेस (SP) - ११

राष्ट्रवादी काँग्रेस (AP) - ८

शिवसेना (उबाठा) - १

इतर - ६

ठाण्यात शिंदे गटाला मोठा धक्का 

ठाण्याचे शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती पराभूत, उपमुख्यमंत्री शिंदे यांना धक्का

ठाण्यात शिंदेंची शिवसेना वाढून 

शिवसेना शिंदे - 24 जागावर आघाडी

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट 4

राष्ट्रवादी अजित पवार गट 4

भाजपा 5

एम आय एम- 5

अपक्ष 1

जागावर आघाडवर आहे

शिंदेंच्या शिवसेनेची १९ जागांवर आघाडी 

शिवसेना शिंदे - 19 जागावर आघाडी

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट 6

राष्ट्रवादी अजित पवार गट 6

भाजपा 2

अपक्ष 1

जागावर आघाडवर आहे

ठाण्यात कोण आघाडीवर

ठाणे महानगरपालिका

एकूण जागा -१३१

प्रभाग -- ३३

एकूण उमेदवार - ६४१

कोण कोण आघाडीवर

भाजप - ८

शिवसेना (शिंदे) - १०

राष्ट्रवादी (अजित पवार) - २

मनसे -

काँग्रेस -

शिवसेना (उद्धव ठाकरे) - ३

राष्ट्रवादी (शरद पवार) - ५

वंचित -

ठाणे हे उमेदवार आघाडीवर

हे उमेदवार आघाडीवर

ठाणे महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 9

अ गणेश कांबळे 3350 पैकी 1417 शिवसेना

ब सुरेखा पाटील 3350 पैकी 1433 अपक्ष

क विजया लासे 2858 पैकी 1633 शिवसेना

ड अभिजित अंकुश पवार 2858 पैकी 1461 राष्ट्रवादी शरद पवार

हे उमेदवार आघाडीवर

ठाणे महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 10

अ पूनम सुधाकर माळी 1522 पैकी 685 एनसीपी अजित पवार

ब खान वहिदा मुस्तफा 1522 पैकी 652 अजित पवार राष्ट्रवादी

क नजीब मुल्ला 1522 पैकी 912 अजित पवार राष्ट्रवादी

ड सुहास देसाई 979 पैकी 399 अजित पवार राष्ट्रवादी

ठाण्यात शिंदेंची मुसंडी 

शिवसेना (शिंदे) - 10

भाजप - 3

शिवसेना (उबाठा) - 2

मनसे - 2

राष्ट्रवादी काँग्रेस (SP) - 3

राष्ट्रवादी काँग्रेस (AP) - 0

प्रथम पोस्टल बॅलेट पेपरची मोजणी 

प्रथेप्रमाणे सर्वात आधी पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी होणार आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचे गुड मॉर्निंग, ७ जागांवर आघाडी

एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिले कल हाती आले असून त्यात ७ जागांवर शिंदेंची शिवसेना आघाडीवर आहे. तसंही शिंदेंच्या शिवसेनेने निकालापूर्वीच बिनविरोध उमेदवार निवडणून आणत खातं उघडलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT