ठाणे

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची बदली

backup backup

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या झाल्या असून प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील दोन महापालिकांसह जिल्हाधिकारी अशा तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची बदली नवीमुंबई महापालिका आयुक्तपदी झाली आहे. तर नवीमुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बदली ठाणे महापालिका आयुक्तपदी तसेच ठामपा आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची बदली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (मुंबई) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली आहे. तर ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून राजेश शिंगारे यांची नियुक्ती झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT