ठाणे

ठाणे : स्मार्ट सिटीमध्ये केंद्राचा निधी आहे हे देखील सांगा; कपिल पाटलांचा एकनाथ शिदेंना टोला

backup backup

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : स्मार्ट सिटी मध्ये एकूण १०० शहरे आहेत. ही शहरे केंद्रातून निवडलेली आहेत. त्यामुळे केंद्राचा बराचसा निधी त्यांच्यासाठी दिला जातो. मात्र ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही तेथे हे सांगितले जात नाही. त्यामुळे पालकमंत्री महोदयांना केंद्राचा निधी पण यात वापरला असल्याचे सर्व ठिकाणी सांगत चला असा टोला खासदार कपिल पाटील यांनी लगावला.

कल्याण-डोंबिवली शहरात गुरुवारी सायंकाळी खासदार कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी दुर्गाडी किल्ल्याजवळ नदी किनारा सुशोभीकरण, कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाचे नूतनीकरण केल्यामुळे उद्घाटन , एमआयडीसी परिसरातील रस्त्याचे काँक्रीटीकरण काम अशा विविध कामाचा शुभारंभ केला.

त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे , खासदार श्रीकांत शिंदे ,कपिल पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश कार्यक्रम देखील यावेळी पडला. यावेळी खासदार कपिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना 'माझी  नाराजी नाही' असे सांगत केंद्राचा निधी वापरला जातो ते सांगायला हवे अशी खंत व्यक्त केली. तसेच प्रभाग रचना आणि पक्ष प्रवेशासंदर्भात विचारले असता प्रभाग रचनेनुसार प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते आपल्याला योग्य वाटणाऱ्या पक्षात प्रवेश घेत असतात त्यामुळे यात कोणतेही नवल वाटण्यासारखे नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT