रेशनिंग शिधा file photo
ठाणे

ठाणे : अंबरनाथमध्ये रेशनिंग शिध्यात 4 लाखांचा अपहार; गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

अंबरनाथ : रेशनिंग दुकानातील शिधाजिन्नसाच्या अपहाराचा प्रकार समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्त्याच्या पुढाकाराने हा अपहार पकडला गेला असून दुकानदारा विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधारण 4 लाख 34 हजार रुपये किमतीच्या शिध्याचा अपहार झाल्याचे समोर आले आहे.

अपहारातील शिधा

  • 2,875 किलो तांदूळ

  • गहू 5420 किलो.

  • प्रधानमंत्री पिशवी 557 नग

  • अंत्योदय साखर 10 किलो,

  • साडी 2 नग

  • आनंदाचा शिधा (रवा, साखर, चनाडाळ, तेल प्रति एक किलो)

  • आनंदाचा शिधा (तेल ), 270 नग

एका टेम्पोतून रेशन दुकानातील माल खुल्या बाजारात विक्रीस जात असताना सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी हा टेम्पो अडवून रेशनिंग जिन्नसाचा अपहार होत असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी हा टेम्पो ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT