प्रातिनिधिक छायाचित्र   (File Photo)
ठाणे

Thane Mira Road | मिरा रोडमध्ये झाडाखाली संशयास्पद वस्तू आढळल्याने खळबळ; बॉम्ब स्क्वॉडकडून तपास सुरू

मिरा-भाईंदरमध्ये अशा प्रकारच्या संशयास्पद घटनांची पुनरावृत्ती होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Mira Road Suspicious Object Found

ठाणे : मिरा रोड येथील शांती पार्क सेक्टर ३ येथील आर.एन. कोर्टयार्ड परिसरात झाडाखाली एक संशयास्पद वस्तू आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही वस्तू बॉम्ब असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली. माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बॉम्ब स्क्वॉड पथकानेही घटनास्थळी पोहोचून तपासणी सुरू केली. मात्र, संबंधित वस्तू बॉम्ब आहे की अन्य काही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, संशयास्पद वस्तू आढळलेल्या ठिकाणासमोरील दुकानाचे सीसीटीव्ही कॅमेरे काल रात्रीपासून बंद असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यामुळे ही वस्तू नेमकी कोणी ठेवली, याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, मिरा-भाईंदरमध्ये अशा प्रकारच्या संशयास्पद घटनांची पुनरावृत्ती होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यासमोर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी पोलीस ठाण्याबाहेर एक संशयास्पद सुटकेस आढळली होती.

मात्र, आता प्रश्न उपस्थित होत आहे की, मिरा-भाईंदरमध्ये वारंवार अशा बॉम्बसदृश वस्तू किंवा धमक्यांच्या घटना का घडत आहेत? या घटनांमागे नेमके कोण आहे? हा केवळ अफवांचा प्रकार आहे की यामागे काही गंभीर कट आहे? याचा सखोल तपास करून नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT