ठाणे

Thane Mayor Election: ठाण्याच्या महापौरपदाची सोडत जाहीर, 'या' दोन नावांची जोरदार चर्चा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे आता सर्वांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदाचे भवितव्य अखेर स्पष्ट झाले. आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी हे पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. महापौर पदासाठी पहिल्यांदाच निवडून आलेल्या दर्शना जाणकार तसेच पद्मा भगत यांच्या नावाची जोरदार चर्चा असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७५ जागा जिंकून एकहाती वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेत शिवसेनेचे पूर्ण बहुमत असून महापौर शिवसेनेचाच होणार हे स्पष्ट झाले होते. मात्र महापौर पदाचे आरक्षण काय पडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. महापौर पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये हे पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने शिवसेनेच्या गोटात हालचाली तीव्र झाल्या असून इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी पद्मा भगत, तसेच दर्शना जानकर यांची नावे आता चर्चेत आली आहेत. दर्शना जानकर या पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. पण, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय असल्याने त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.तर पद्मा भागात यांच्या नावाची देखील चर्चा आहे. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही महत्वाची जबाबदारी कोणावर सोपवणार, या पदावर कोणाची वर्णी लागणार, याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT