भिवंडी शहरातील बालाजी नगर परिसरातील तपस्या डाईंगमध्ये आग लागली. pudhari news network
ठाणे

ठाणे : भिवंडीत तपस्या डाईंगला भीषण आग

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी शहरातील बालाजी नगर परिसरातील तपस्या डाईंगमध्ये मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डाईंगच्या बॉयलरमधून ऑईलची गळती झाल्याने ही आग लागली. आगीमुळे डाईंगमध्ये मोठा स्फोट झाला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ भिवंडी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी तातडीने दाखल झाल्यानंतर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. डाईंगमध्ये कच्चा कपड्यावर रंग प्रक्रिया करण्यात येत असून, जेव्हा आग लागली त्यावेळी कंपनीत काही कामगार काम करीत होते. त्यांना तत्काळ स्थानिकांना बाहेर काढले. त्यामुळे या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले आहे. परंतु आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT