नेवाळी (ठाणे) : कल्याण ग्रामीण भागातील खिडकाळेश्वर प्राचीन शिव मंदिरात मोठ्या संख्येने भाविक महाशिवरात्री निमित्त भाविकांनी गर्दी केली आहे. भाविकांची येण्याची संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मंदिर परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. यंदा महाशिवरात्री बुधवार (दि.26) निमित्त मध्यरात्री नवं निर्वाचित आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत मध्यरात्री पूजा करण्यात आली आहे. या महापूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलं आहे.
कल्याण ग्रामीण भागातील खिडकाळी येथे प्राचीन शिव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. यंदा देखील महाशिवरात्री निमित्त परिसरातील भाविकांची मोठी गर्दी दिसून आली आहे. मंदिर परिसरात ग्रामस्थांकडून किर्तन, भजन दिवस भर सुरू असणार आहे. तर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिळं डायघर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. यंदा प्राचीन शिव मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी मंगळवार (दि.26) मध्य रात्रीपासून रांगेत उभे राहिले होते. ग्रामस्थांनी मध्यरात्री पूजा करून मंदिर मध्य रात्रीपासून भाविकांसाठी खुले केलं आहे.