मुरबाड; पुढारी वृत्तसेवा : मुरबाड तालुक्यातील माळ व जांभूळवाडी परिसरात बिबट्याची दहशत सुरू आहे. या बिबट्याने मंगळवारी (दि. ९) रात्री एका गायीच्या वासराला ठार करुन खाऊन टाकल्याची घटना घडली. या माळ व जांबूळवाडी परिसरात मोठी घबराट निर्माण झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच टोकावडे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष डगले यांच्या टीमने घटनास्थळी जाऊन भेट दिली तसेच घटनेची माहिती घेतली आहे.तसेच जांबूलवाडी येथील नरेश खोडका त्यांच्या गाईचं वासरू खाल्ले आहे. त्याचा रितसर वनखात्याच्या मार्फत पंचनामा करण्यात आला आहे.तसेच नियमानुसार त्यांना भरपाई देण्यात येणार आहे अशी माहिती टोकोडे वनपरिक्षेत्राधिकारी संतोष डगले यांनी दिली आहे.
या घटनास्थळी या वनखात्याच्या टीमने पाहणी करून तिथे तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहे. तसेच या टोकावडे खात्याच्या मार्फत या परिसरात नागरिकांना आवाहन करण्यात आले की आपण घराबाहेर पडू नये तसेच नागरिकांनी सावधानता बालगावी अशा प्रकारच्या सूचना टोकावडे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष डगले यांच्या टीमने दिली आहे. तेथील परिस्थितीवर टोकावडे वन खात्याचा कडक पहारा असल्याचे चित्र दिसून येत आहे.