landslide
कसारा घाटात दरडी कोसळली. 
ठाणे

ठाणे : कसारा घाटात दरडी कोसळल्या; धिम्या गतीने वाहतूक सुरू

पुढारी वृत्तसेवा

कसारा : कसारा परिसरात पावसाची संततधार सुरू असून या भागात दरडी कोसळ्याचे प्रमाण वाढले आहे. नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात ब्रेक पॉईंटजवळ शुक्रवारी (दि.११) संध्याकाळी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या. परिणामी यामुळे घाटातील वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

कसारा घटात मुसळधार पावसामुळे दोन्ही मार्गांवर दरडी कोसळल्या. त्यानंतर कसारा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी के.डी कोल्हे व कर्मचारी यांनी घाटात जाऊन आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने महामार्ग वरील काही दगड बाजूला केले. संध्याकाळी पुन्हा नवीन घाटातील ब्रेक फेल पॉईंट जवळ मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या. सुदैवाने यावेळी महामार्गावर एकही गाडी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. परिणामी अचानक पडलेल्या दरडीमुळे नाशिकहून मुंबईकडे जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. त्यानंतर पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन टीमने वाहनचालकांना सावध केले. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने पोलिसांनी महामार्गावरच्या दरडी बाजूला करत रात्री ९.३० वाजता वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून दिला.

SCROLL FOR NEXT