महामार्गावर झेब्रापट्टया, निर्देशपट्ट्यांचा अभाव  pudhari news network
ठाणे

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर झेब्रापट्टया, निर्देशपट्ट्यांचा अभाव

पुढारी वृत्तसेवा
भिवंडी : सुमित घरत

भिवंडी शहराबाहेर ठाणे-मुंबई येथे जाण्यासाठी अंजूरफाटा-कशेळी हा मार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्ग आहेत.त्यापैकी अंजूरफाटा- कशेळी या मार्गाचे सिमेंटीकरण झाले आहे. तर ठाणे-नाशिक या मार्गावर रस्ता रुंदी करणाचे व सिमेंटीकरणाचे बरेसचे काम झाले आहे. मात्र या मार्गावर अद्याप सर्व्हिस रोड,वाहनांना जाण्यासाठी निर्देशपट्ट्या आणि रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग आदी वाहतूक नियमानुसार सफेद व पिवळ्या-काळ्या रंगाने पट्ट्या न मारल्या नाहीत. त्यामुळे रस्ता ओलांडणार्‍या पादचार्‍यांच्या मृत्यूमध्ये वाढ होऊ लागली आहे.

मागील चार दिवसांत झालेल्या चार रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.त्यापैकी दोन जणांचा रस्ता ओलांडताना अपघात झाला असून महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने रस्ते ओलांडण्यासाठी पादचार्‍यांना कसरत करावी लागत आहे.त्यामधून हे अपघात घडत आहेत.पोलिसांच्या माहितीनूसार कल्याण पश्चिम येथील मुनिराज गावित (52) हे रविवारी सकाळी दुचाकीवरून माणकोली पुलाजवळ खदानसमोर आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

तसेच रिाहनाळ गाव परिसरात पादचारी सुनील महतो (45) हा रस्ता ओलांडत असताना त्यास एका टेम्पोने धडक दिली. यात त्यांता जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी फरार ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेच्या एक दिवसापूर्वी पादचारी अमजद अली कय्युम अन्सारी (43) हे ओवळी गावच्या हद्दीत रस्ता ओलांडत होते. त्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेच जागीच मृत्यू झाला. तर महेंद्रसिंग खिची (35) हे दुचाकीवरून जात असताना त्यांना टेम्पोने धडक दिली. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.अशा अपघाताच्या घटना नियमित सुरु असून वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.

नागरिकांची सुरक्षा वार्‍यावर

भिवंडी शहरातून बाहेर पडण्यासाठी असलेल्या प्रत्येक मार्गावर टोलवसुली सुरु होती. तेंव्हापासून रस्त्यावर वाहतुकीच्या नियमानुसार रस्त्यांवर सफेद,काळ्या व पिवळ्या रंगाने निर्देशपट्टे मारले नव्हते अथवा नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिशादर्शक कोणत्याही उपाययोजना केल्या नव्हत्या. त्यामुळे या मार्गावर नेहमी अपघात होऊन अपघाताची संख्या वाढत होती. त्यावेळी डांबरी रस्ते होते आता सिमेंटचे रस्ते आहेत.या उपाययोजना न केल्याने या मार्गावरील वाहने सरळ दिशेत चालत नसून वेडीवाकडी आणि गर्दी करून चालत असल्याने अपघात होतात.त्याबरोबर वाहतूक कोंडी देखील होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT