Kasarvadavali Flyover Reopened  Pudhari
ठाणे

Kasarvadavali Flyover | वाहतुकीसाठी कासारवडवली उड्डाणपूल पुन्हा सुरु : नागरिकांची कोंडीतून सुटका

निकृष्ट कामामुळे उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद करून तब्बल दीड महिन्यानंतर उड्डाणपूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला

पुढारी वृत्तसेवा

Thane Kasarvadavali Flyover Reopened

ठाणे : ऐन गणपती उत्सवात घोडबंदर रोडवरील कासारवडवली उड्डाणपुलाचा काही भाग तुटला आणि दुरुस्तीसाठी वाहतुकीसाठी पूल बंद झाला. निकृष्ट कामामुळे उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद करून तब्बल दीड महिन्यानंतर उड्डाणपूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे कासारवडवली परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

घोडबंदर रोडवरील कासारवडवली उड्डाणपूल हा घाईघाईने बांधण्यात आला असून त्याचे उद्घाटनही तसेच झालेले होते. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या ठाणेकरांना .एमएमआरडीएने बांधलेल्या या उड्डाणपुलामुळे थोडा दिलासा मिळाला होता. मेट्रोचे काम युद्धपातळीवर सुरू असून सर्व्हिस रोड हा मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कासारवडवली पुलाचे ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारा एक भाग तयार झाला असून दुसऱ्या भागाचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

तरीही कासारवडवली उड्डाणपूल वाहतूक कोंडीतून मुक्तता देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. १४ महिन्यापूर्वी बांधलेल्या या पुलावर खड्डे पडले आणि त्याचा काही भाग तुटला. पुलाच्या दोन्ही बाजूला जोडणारा भाग तुटल्याचे दिसत होता. पूल हालत होतो. याची गंभीर दखल घेऊन वाहतूक पोलिसांनी उड्डाणपूल १३ सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी बंद ठेवला आणि पुन्हा वाहतूक कोंडीला सुरुवात झालीं आहे.

या पुलाचा अहवाल येऊन त्याची पुन्हा दुरुस्ती सुरु झाली. तब्बल दीड महिन्यानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आणि पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु झाला. त्यामुळे कासारवडवली परिसरात राहणाऱ्यांना नागरिकांना दिलासा मिळाला तर वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून सुटका झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT