Thane Kasarvadavali flyover Pudhari News Network
ठाणे

Thane Kasarvadavali flyover: उद्यापासून कासारवडवली उड्डाणपूल होणार वाहतुकीसाठी खुला

वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या वाहतूक प्रकल्पांपैकी एक असलेला कासारवडवली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टप्पा अंतिम टप्यात असून मंगळवार (दि.8) उद्यापासून हा पुल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. दुपारी दोन वाजता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण होणार आहे.

कासारवडवली उड्डाणपूलाच्या पहिल्या टप्प्यात डाव्या बाजूची मार्गिका उद्यापासून वाहतुकीसाठी खुली होणार असून या उड्डाणपूला वर ३०० मीमी जाडीचा एम-40 ग्रेड सिमेंट काँक्रीटी थर असून मध्यभागी असलेल्या भूयारी मार्गाच्या पृष्ठभागावर मॅट्रेसचा थर पसरवून सदर पुलाचे भक्कम बांधकाम करण्यात आले आहे.

या उड्डाणपुलाच्या निर्मितीमुळे ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई तसेच जेएनपीटी, बोरीवली, वसई, विरार आणि गुजरातकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच गुजरात ते जेएनपीटी दरम्यानच्या वाहतुकीस अडथळा न होता सुलभ मार्ग उपलब्ध होणार. या बरोबरच वाशी ते ठाणे, नवी मुंबई कार्यालयात जाणाऱ्या वाहनांसाठी भुयारी मार्गाच्या र्निर्मितीमुळे गायमुख ते वाघबिळ या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

घोडबंदर मार्गावरील तीव्र वाहतूक भार लक्षात घेता उड्डाणपूल दोन टप्प्यांमध्ये बांधण्यात येत आहे. पहिला टप्प्यात डावीकडील बाजू (ठाण्याकडून गाईमुखकडे) पूर्ण झाली असून उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उजवीकडील बाजूची (गायमुखकडून ठाणेकडे) पावसाळ्यानंतर स्थापत्य कामे हाती घेण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT