फुले खरेदीसाठी भक्तांची गर्दी  pudhari news network
ठाणे

ठाणे : कल्याण फुलमार्केट फुलांनी बहरले

विविध राज्य, जिल्ह्यांतून फुलांची मोठी आवक; फुले खरेदीसाठी भक्तांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा
कल्याण : सतीश तांबे

गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत लाल फुलांनी करण्यासाठी तसेच विविध फुलांनी सजविण्यासाठी गणेश भक्तांची धावपळ होत आहे. गणेशभक्तांची फुलांची मागणी पाहता कल्याणातील एपीएमसी मार्केटमध्ये विविध राज्यातून तसेच जिल्ह्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची आवक वाढली आहे.

काही वर्षापूर्वी फुलांना दादर येथे बाजारपेठ असल्याने मुंबई , ठाण्यातील फूल विक्रेत्यांना दादरला जावे लागत होते. त्यानंतर कल्याणात कृषी उत्पन्न बाजार समितीने फुलबाजारासाठी जागा उपलब्ध करून दिली. गेल्या दोन दिवसापासून एपीएमसी मार्केटमध्ये विविध जिल्ह्यातून शंभर ते सव्वाशे हून अधिक जीप ट्रक मधून पंधराशे क्विंटल विविध प्रकारची फुले विक्रीसाठी मार्केटमध्ये आवक झाली असल्याची माहिती दिली गणेशोत्सव काळात फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने फुलांची आवक दोन हजार क्विंटल पोचू शकेल असाही विश्वास घाऊक फुल विक्रेत्यांनी दिला. गेल्या दोन दिवस फुलांनी भरलेल्या सुमारे 133 पिक अप व्हॅन तर मोठ्या पाचा ट्रक असे 146 गाड्या मधून सुमारे दीड हजार क्विंटल फुले मार्केट विक्रीसाठी आली असल्याची माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील घाऊक फुलं विक्रेत्यांनी दिली तर गेल्या दोन दिवसापासून मिळणार्‍या फुलाच्या किमतीच्या गणेशोत्सवाच्या आगमनामुळे दरात अचानकपने वाढ झाली आहे.

या जिल्ह्यांतून आली फुले

अंबरनाथ व बदलापूरसारख्या जवळच्या शहरांपासून ते नागपूर, उस्मानाबाद, बीड, गेवराई, लासलगाव, पुणे, सिन्नर, नाशिक आळेफाटा, अकोला आणि अहमदनगर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यातून येतात.

फुल मार्केटमधील विविध फुलांचे दर असे...

  • झंडू ऑरेंज 120 /150 रुपये किलो

  • झंडू येलो 80/100 रुपये किलो

  • कापरी 160/200 रुपये किलो

  • सफेद सेवंती 150 रुपये किलो

  • येलो शेवंती 250/300 रुपये किलो

  • निशिगंधा 400/500 रुपये किलो

  • लूज गुलाब 300 रुपये किलो

  • सोनचाफा 800 रुपये शेकडा,

  • आस्टर 300 रुपये किलो

  • गुलाब पाकळी 250 रुपये किलो

  • शेवंती पिंक 300 रुपये किलो

  • जरबेरा 100 रुपये बंडल

  • आर्केड 600 रुपये बंडल

  • जिप्सी 500 रुपये बंडल

  • लिली 30 रुपये बंडल

  • मोगरा 400/500 रुपये किलो

  • काकडा 300 रुपये किलो

  • जूई 600 रुपये किलो

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT