Raju Patil brother Vinod Patil ED raid
कल्याण: कल्याण परिसरात आज (दि.१२) सकाळी मोठी कारवाई कऱण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांच्या भावाच्या घरी अंमलबजावणी संचालनालय (ED) च्या अधिकाऱ्यांनी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली.
ईडीचे पथक घरात दाखल झाल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांनी घराची सखोल तपासणी सुरू केली असून, मागील जवळपास 11 तासांपासून विनोद पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
सदर छापा लोढा प्रकरणाशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, ईडीकडून या संदर्भात अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तपासात नेमके कोणते व्यवहार किंवा दस्तऐवज तपासले जात आहेत, याबाबतही अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.
या कारवाईमुळे मनसे नेते राजू पाटील यांच्या कुटुंबात तसेच स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, ईडीचे अधिकारी अजूनही घरातच तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.