पालघर जिल्ह्यातील विरार मधील भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेले जीवदानी मंदिर. pudhari news network
ठाणे

ठाणे : जीवदानी मंदिर नवरात्रोत्सवासाठी सज्ज

मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त; भाविकांची होणार गर्दी

पुढारी वृत्तसेवा

वसई : पालघर जिल्ह्यातील विरार मधील भाविकांच्या श्रद्धेचे स्थान म्हणून जीवदानी मंदिर ओळखले जाते. नवरात्रोत्सवात जीवदानी गडावर मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मंदिरावर 150 सिसिटीव्हीच्या माध्यमातून तिसर्‍या डोळ्याची सतत नजर असणार आहे. त्याचबरोबर कोणताही घातपात होऊ नये म्हणून शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्याचबरोबर नवरात्रोत्सवात गडावर भाविकांची गर्दी होणार असल्याचंही माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर आणि उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी दिली आहे.

मंदिर सुरक्षेचा आढावा एटिएसने सुद्धा घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी सुरक्षा कवच ही उभारण्यात आले आहे. नऊ दिवस मंदिरात होणारी भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या जोडीला विवा महाविद्यालयाचे 200 एनसीसी विद्यार्थी हजर असणार आहेत. हत्यार बंद पोलिसांची तुकडी तैनात असणार आहे. देवीच्या दर्श नासाठी येणार्‍या भाविकांची गदीज्ञ लक्षात घेता जीवदानी मंदिरात जण्यासाठी असलेल्या फेनिक्युलरची चाचणीही यशस्वी झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील विरार मधील जीवदानी मंदिर.

महाप्रसादाचे विनामूल्य वाटप

नवरात्राचे 9 दिवस येणार्‍या भाविकांना महाप्रसादाचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गडावर 50 हजारांच्या आसपास भाविकांची गर्दी होइल असा अंदाज वर्तवला जात आहे. नवरात्रोत्सवात येणार्‍या रविवारी हाच गर्दीचा आकडा लाखांपर्यत जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने नवरात्रोत्सवाची सर्व तयारी अंतिम टप्प्याचे असल्याचे प्रदीप तेंडोलकर आणि पंकज ठाकूर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT