उद्या शहराचा पाणीपुरवठा बंद File Photo
ठाणे

Thane | ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, उद्या पाणीपुरवठा राहणार बंद

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून ते शनिवार सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

या शटडाऊन कालावधीत स्टेम प्राधिकरण योजनेमधील देखभाल दुरुस्ती करणे व पिंपळास येथील शुद्ध पाणी वाहून नेणारी १५३० मि.मी व्यासाच्या जलवाहिनीवर गळती थांबविण्याची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या पिसे व टेमघर शुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशन, पंपिग मशिनरीची तातडीची निगा, देखभाल, दुरुस्ती व इतर तातडीचे कामे करण्यासाठी महापालिका स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचा व मे. स्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा २४ तासाचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे.

परिणामी शुक्रवार २७ सप्टेंबरपासून सकाळी ९ ते शनिवार सकाळी ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भागात २४ तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

सदर कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT