ठाणे : येथील हायपर सिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. आगीचे लोट दुरवरून दिसून येत असून घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी आग विझवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवार (दि.28) सकाळी 8 च्या सुमारास ही आग लागली. आगीचे लोट दुरवरून दिसून येत आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार ठाणे घोडबंदर रोडवरील हायपर सिटी मॉलमधील पुमा बूट्सच्या शोरूममध्ये ही आग लागली. ही आग सकाळी 8 च्या सुमारास लागली. दुकानातून आगीचे व धुराचे लोट येत होते. याची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला दिली. ठाणे महानगर पालिकेचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी तातडीने आगीवर पाण्याचा मारा करत, आग काही वेळात आटोक्यात आणली आहे. सुदैवाने या घटनेत कुणी जखमी अथवा जीवितहानी झालेली नाही. आगीची तीव्रता खूप जास्त होती. आगीच्या लोटामुळे परिसरातील काही दुकानांना देखील आग लागली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून दोन ते तीन शोरूमना आगीचा मोठा फटका बसला आहे