भिवंडी
भिवंडी : पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या मुलांवर भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचार करताना डॉक्टर.  pudhari news network
ठाणे

Thane | भिवंडीत पिसाळलेल्या श्वानाचा हैदोस; 25-30 जणांना चावा, दोन गंभीर

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : शहरातील शांतीनगर परिसरातील गौसिया मस्जिद परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला असून सोमवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी जाणार्‍या मुलांवर त्यांनी हल्ला चढवत तब्बल 25 ते 30 जणांना चावा घेतला आहे. त्यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा लहान मुलांचा अधिक समावेश आहे.

भिवंडी : श्वानदंश झाल्याने स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचार घेताना घाबरलेली लहान मुले

या पिसाळलेल्या कुत्र्याने मागील तीन दिवसात या परिसरात अनेक नागरिकांना चावा घेतल्यानंतर आज या कुत्र्याने हैदोस घालत हा हल्ला चढवला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली व सर्वच चावा घेतलेला मुलांना स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोघाजणांची प्रकृती गंभीर झाली आहे. सर्वांवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

श्वानदंश

नागरिकांनी कुत्र्याला ठार मारले

स्थानिक नागरिकांनी या पिसाळलेल्या कुत्र्याला दगडाने ठेचून ठार मारले आहे. भिवंडी पालिका क्षेत्रातील कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मागील कित्येक वर्षांपासून बंद असून त्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आय जी एम रुग्णालय दाखल रुग्णांवर रेबीज सह त्यांना प्रतिबंधात्मक इलाज करण्यात आले आहेत तर तीन मुलांच्या तोंडाला चावे घेतल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे रुग्णालयात पाठविण्यात आले असून रुग्णालयातील सर्व बालकांना वैद्यकीय निरक्षणात ठेवण्यात आले आहे. अशी माहिती आय जी एम रुग्णालयाच्या अधीक्षका डॉ.माधवी पंधारे यांनी दिली आहे.

SCROLL FOR NEXT