अंबरनाथ : गेलद्वारा, अंबरनाथ येथील महानगर गॅस लिमिटेडच्या (एमजीएल) सिटी गेट स्टेशनला (सीजीएस) गॅसचा पुरवठा करणार्या मुख्य पाइपलाइनवर मंगळवार, दि. 19 नोव्हेंबर रोजी महत्त्वाचे देखभालीचे काम करण्यात येत आहे.
परिणामी, 19 नोव्हेंबर रोजी अंबरनाथला होणारा गॅस पुरवठा तात्पुरता स्थगित केला जाईल. त्यामुळे या शहरातील सीएनजी स्टेशन्स, उद्योग आणि व्यापारी आस्थापनांचा गॅस पुरवठा बंद होईल. या काळात घरगुती पीएनजी गॅस ग्राहकांचा पुरवठा प्राधान्याने अखंडित राखला जाईल याची खात्री करेल. सीएनजी पुरवठ्यातील व्यत्ययाचा प्रभाव कमी करण्यासाठी, एमजीएलने तिच्या डॉटर बूस्टर सीएनजी स्टेशन्सवर तिच्या मोबाईल सीएनजी कॅस्केड्सद्वारे गॅस पुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे. औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांना पर्यायी इंधनाकडे वळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संबंधित ग्राहकांच्या होणार्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे महानगर गॅस लिमिटेडने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.