सामूहिक बलात्‍कार
सामूहिक बलात्‍कार 
ठाणे

Thane | सामूहिक बलात्कारातील आरोपी २२ वर्षांनंतर गजाआड

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत २२ वर्षांपूर्वी ४ इसमांनी सामुहीक बलात्कार व विनयभंग केला होता. त्यातील २ आरोपींना अटक करण्यात आले असून २ आरोपी फरार आहेत. त्यातील एका आरोपीला २२ वर्षानंतर मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे.

नालासोपारा पूर्व येथुन २२ वर्षापूर्वी एका २६ वर्षीय महिलेसोबत आपसांत संगनमत करुन जबरदस्तीने रिक्षात कोंबून नालासोपारा पूर्व येथील तानीया टाऊनकडे जाणाऱ्या रस्त्यांवर नेवुन ४ जणांनी आळीपाळीने अत्याचार केला. तिच्याशी अश्लील चाळे करुन विनयभंग केला. तसेच त्या महिलेला ठोशा बुक्याने मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी फिर्यादीने नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यामधील २ आरोपी शंकर आणि मायकल गुन्ह्याच्या दिवसापासून फरार आहेत. गुन्हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याने तसेच नमुद गुन्हयातील फरार आरोपी शंकर तसेच मायकल यांचा यापूर्वी सर्वोतोपरी शोध घेऊन देखील ते गेल्या २२ वर्षापासून मिळून येत नव्हते, हे दोन्ही आरोपी पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी होत होते. पथकाने या गुन्हयाची नालासोपारा पोलीस ठाण्यातून माहिती घेऊन आरोपीचा शोध सुरू केला. पाहीजे आरोपीचा शोध घेत असताना मायकल याचे नांव मायकल ऊर्फ टिप्पु राम शिरोमण पाण्डेय असे असल्याची माहीती मिळाली. त्यानंतर सलग १ महिन्यांपासुन अहोरात्र तपासात सातत्य ठेवून आरोपीची गोपनीय माहिती काढली. आरोपी हा नालासोपारा परीसरातच रिक्षा चालवत असल्याची व कोणत्यातरी मंदीरात राहत असल्याची माहीती मिळाली.

पोलीस पथकाने गेल्या ५ दिवसा पासून सतत ऑटो रिक्षा स्टॅन्ड, नालासोपारा रेल्वे स्टेशन पश्चिम येथे पाळत ठेवुन सापळा रचून फरार आरोपी मायकल ऊर्फ टिप्पु राम शिरोमण पाण्डेय याला बुधवार (दि. ३ जुलै) रोजी दुपारी ३ वा. ताब्यात घेतले आहे.

SCROLL FOR NEXT