उसनेवारीने पैसे न दिल्याने मित्राचा खून  
ठाणे

ठाणे : उसने पैसे न दिल्याने मित्राचा दगडाने ठेचून खून

पुढारी वृत्तसेवा

कसारा : उसनेवारीने पैसे मागितले असता न दिल्याने मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या एका मित्राने दुसऱ्याचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गांवरील ऑरेंज हॉटेलच्यामागे घडली. मुन्ना सखीचंद्र बैठा असे खून झालेल्या तरूणाचे नाव असून याप्रकरणी संतुलाल बन्सल याला आज (दि.१) पोलिसांनी बेस कॅम्प परिसरातून अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी, समृद्धी महामार्गावर वेल्डिंगचे काम करणारे कामगार मुन्ना बैठा, संतुलाल बन्सल व अजय रावत हे तिघे मित्र रविवारी रात्री कामाला सुट्टी असल्याने पार्टी करायला गेले. पार्टी करून पुन्हा कंपनीतील कॅम्पवर येत असताना रस्त्यात संतुलाल बन्सल याने मुन्नाकडे एक हजार रुपये उसने मागितले. परंतु मुन्नाने पैसे देण्यास नकार दिल्याने दारू पिलेल्या संतुलाल याने मुन्नाला जबर मारहाण केली. त्यानंतर टोकधार दगडाने मुन्नावर हल्ला केल्याने मुन्नाचा मृत्यू झाला. दोघांची भांडणे सोडवण्यास मध्यस्थी करणाऱ्या अजय रावत यालाही संतुलाल याने मारहाण केली. घटनेनंतर संतुलाल याने घटनास्थळावरून पळ काढला. मुंबई-नाशिक महामार्गांवरील ऑरेंज हॉटेलच्या मागे तरूणाचा सोमवारी (दि.३०) मृतदेह आढळून आल्यानंतर त्याचा दगडाने ठेचून खून केल्याची बाब निदर्शनास आली. त्यानंतर कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर सील करीत तपास सुरु केला.

ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.डी. एस.स्वामी, उपविभागीय पोलीस अधीक्षक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक व फॉरेन्सक टीमच्या मदतीने कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश साहेब यांच्या पथकाने २४ तासात संशयित आरोपी संतुलाल बन्सल याला बेस कॅम्प परिसरातून अटक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT