वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या ताफ्यात 64 मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर वाहन दाखल झाले असून सोमवार (दि.14) या वाहनाचे प्रात्यक्षिक महानगरपालिका मुख्यालय येथे परिवहन विभागाच्या मोकळ्या जागेत दाखविण्यात आले. या प्रात्यक्षिक कार्यक्रमावेळी मा.आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार राजेश पाटील, आयुक्त अनिलकुमार पवार (भा.प्र.से), माजी खासदार बळीराम जाधव, माजी महापौर रुपेश जाधव, परिवहन सभापती कल्पक पाटील, महानगरपालिकेचे माजी पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या संरक्षणाकरिता खरेदी करण्यात आलेली 64 मीटर उंच टर्न टेबल लॅडर ही अतिशय महत्वाची उपलब्धी आहे. या वाहनाची किंमत रक्कम रु.12,32,00,000/- इतकी असून विशेषतः महानगरपालिका क्षेत्रातील उंच इमारतींमध्ये आग लागण्याची घटना घडल्यास या वाहनाच्या साहाय्याने तेथील आगीवर तात्काळ नियंत्रण आणता येणार आहे. तसेच दुर्घटना स्थळी लोकांना सुरक्षित रित्या रेस्क्यू करण्याचे कार्य देखील सहजरीत्या पार पाडू शकतो. सदर वाहन हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असे अद्यावत अतिशय महत्वाचे आग प्रतिबंधक व जीव संरक्षक वाहन आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या ताफ्यात 64 मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर वाहन दाखल झाले असून शहरातील उंच इमारतींमध्ये आग लागण्याची दुर्घटना घडल्यास तेथील आगीवर तात्काळ नियंत्रण आणून तेथील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी या यंत्रणेचा वापर होणार आहे. या यंत्रणेमुळे रेस्क्यू ऑपरेशन अधिक क्षमतेने व गतीने करता येणे शक्य होणार आहे.अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका, ठाणे.