अरिहंत कॉम्प्लेक्स परिसरात पुठ्ठ्याच्या गोदामाला भीषण आग  pudhari news network
ठाणे

Thane fire News | भिवंडीत पुठ्ठ्याच्या गोदामाला भीषण आग

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : तालुक्यातील कोपर ग्रामपंचायत हद्दीमध्ये अरिहंत कॉम्प्लेक्स परिसरात पुठ्ठ्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि.11) सायंकाळी घडली आहे. या आगीत गोदामातील मोठ्या प्रमाणात साठवणून करण्यात आलेला पुठ्ठ्याचा माल जळून खाक झाला असून गोदाम मालकाचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाची एक गाडी रवाना झाली. यासह सदर आग ठाण्याहून नजीकच्या परिसरात असल्याने अग्निशमन दलाच्या अन्य गाड्या ठाण्याहून पाचारण करण्यात आल्याची माहिती भिवंडी अग्निशमन दलाकडून देण्यात आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जिवीतहाणी झाली नाही मात्र मोठी वित्तहाणी झाली आहे.

पुठ्ठयाच्या गोदामाला आग लागल्याची घटना समजताच अग्निशमनदल तात्काळ घटनास्थळी रवाना झाले होते. मात्र भिवंडी - कोपर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने अग्निशमन दलाला घटनास्थळी जाण्यासाठी विलंब लागला.या गोदामात मोठ्या प्रमाणात कागदी पुठ्ठे ठेवण्यात असल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून मिळाली असून या गोदामात दोन सिलेंडर असल्याने त्यांचा स्फोट होण्याच्या भीतीने परीसरात भीतीचे वातावरण पसरले होते.तर पुठ्ठ्याचा संपूर्ण मालच आगीच्या भक्षस्थानी पडल्याने धुराच्या लोटांमुळे अग्निशमन जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण निर्माण झाली होती.मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न भिवंडी अग्निशमन दल आणि ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवून काही तासांच्या प्रयत्ना नंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT