दाल्शन फूड कंपनी pudhari file photo
ठाणे

ठाणे : उल्हासनगरात बिस्कीट कंपनीला आग

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प 4 मधील बाबा प्राईम जवळील दाल्शन फूड कंपनीला आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या कंपनीत बिस्कीट उत्पादनाची प्रक्रिया सुरू असताना अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, परंतु कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कंपनीतील सर्व कर्मचार्‍यांना वेळीच बाहेर काढल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र कंपनीतील यंत्रसामग्री व तयार बिस्कीटांचा मोठा साठा आगीत भस्मसात झाला आहे. आगीच्या घटनेनंतर स्थानिक पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT