ठाणे ; पुढारी वृत्तसेवा ठाणे लोकसभा मतदारसंघातील 148 विधानसभा मतदारसंघातील नौपाड्यातील दिव्यांग कला केंद्रातील मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन बंद पडल्याने काही काळ गोंधळ उडाला. मात्र तात्काळ दुसरे मशीन देण्यात आल्याचे निवडणूक यंत्रणेच्या वतीने सांगण्यात आले. शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी या मतदान केंद्राला भेट देऊन मतदानासाठी एक तास वाढवून देण्याचे मागणी केली.
ठाणे लोकसभा ठाणे शहर मतदार संघातील नौपाडा येथे सकाळीच उत्साहात मतदारांनी हजेरी लावलीथ्. जिजामाता उद्यानातील दिव्यांग कला केंद्राच्या मतदान केंद्र 346 मोक पोल दरम्यान मशीन बंद पडले होते. तथापी वीस मिनिटांमध्ये सदरची ईव्हीएम मशीन बदलून तिथे मतदान पुन्हा सुरळीत सूर झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा :