भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक फेस - 4 परिसरात खडी घेऊन जाणारा ट्रक स्लॅब तुटून नाल्यात पडला. pudhari news network
ठाणे

ठाणे : रस्त्यावरील स्लॅब तुटल्याने डंपर नाल्यात पडून अपघात

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक फेस - 4 परिसरातील नवीन सिमेंट रस्त्याचे काम सुरु आहे. त्या ठिकाणावरून खडी घेऊन जाणारा ट्रक स्लॅब तुटून नाल्यात पडला. त्याठिकाणी बाजूला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिरा भाईंदर शहरात अनेक ठिकाणी एमएमआरडीए व महापालिका कडून सिमेंट रस्त्याची कामे सुरू आहेत. रस्त्याची कामे सुरू असताना ठेकेदाराकडून कोणतीही सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. रस्त्याचे काम सुरु असताना वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. रस्त्याचे काम झाल्यानंतर अनेक ठिकाणी गटारावर टाकण्यात येणारी झाकणे ही कमी दर्जाची टाकण्यात येतात. त्यामूळे झाकणे तुटण्याच्या घटणा घडत आहेत. भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक फेस -4 परिसरातील नविन सीमेंट रस्त्याचे काम सुरु आहे. त्या ठिकाणावरून खडीने भरलेला ट्रक जात असताना स्लॅब तुटला व तो ट्रक पलटी झाला. त्या गाडीतील खडी बाहेर पडली आहे. त्या ठिकाणी चारचाकी गाडी उभी होती त्या गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या ट्रॅकमधून मर्यादेपेक्षा जास्त खडी भरल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात आहे.

ठेकेदाराने सुरक्षेची काळजी घेतली असती तर हा अपघात घडला नसता असे देखील सांगितले जात आहे. मीरा भाईंदर शहरात अवजड वाहतुक मोठ्या प्रमाणात होत असून त्यात ट्रॅकमध्ये नियमांचे उल्लंघन करून जास्त माल भरुन गाडी चालवत असल्याने अपघात होत असतात. त्यावर मीरा भाईंदर काशीमिरा वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभाग ठाणे आणि महसुल विभाग कारवाई करत नसल्याने खुलेआम वाहतूक होत आहे. या अपघाताची माहिती स्थानिक नवघर पोलीस ठाणे यांना मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक धिरज कोळी, पोलीस निरीक्षक अशोक कांबळे, यांनी घटनास्थळी पोहोचून त्याठिकाणी बॅरिगेट लावून वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळविली .

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT