डोंबिवली एसटी स्थानकाच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने एमआयडीसीतील एसटी स्थानक पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.  (छाया : बजरंग वाळुंज)
ठाणे

Thane | डोंबिवली एसटी स्थानकात लवकरच सुधारणा होणार

राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली एसटी स्थानकाच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेत अनेक तक्रारी दिल्या होत्या. वस्तुस्थिती जाणून घेण्याकरिता शनिवारी (दि.22) रोजी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीच्या एमआयडीसीतील एसटी स्थानकाला भेट दिली. या भेटीदरत्यान परिसरात प्रसाधनगृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचे आढळून आले. प्रवाशांच्या सेवेसाठी शिवसैनिकांनी उचललेल्या आक्रमक पावित्र्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने या स्थानकात लवकरच सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे.

शहरप्रमुख अभिजीत सावंत यांच्या नेतृत्वाखाली कल्याण ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख राहूल भगत, परिवहन समितीचे माजी सभापती सुधीर उर्फ भैय्यासाहेब पाटील, उपविभाग प्रमुख कुणाल पवार, किशोर सोनी, गोविंद कुलकर्णी, विलास नायर, शाखाप्रमुख मंगेश सरळकर, संदीप नाईक, तसेच युवा सेनेचे अनुज मोरे, आनंद तांबेकर, सचिन कुलकर्णी, नारायण गायकवाड, आदींनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी आगार व्यवस्थापक महेश भोये यांच्याशी बसस्थानकाबाबत चर्चा झाली.

बसस्थानक परिसरात प्रसाधनगृह गेल्या काही महिन्यांपासून बांधून तयार आहे. परंतु, टेंडरला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आजही नवीन प्रसाधनगृह बंद अवस्थेत आहे.

बसस्थानक परिसरात प्रसाधनगृह गेल्या काही महिन्यांपासून बांधून तयार आहे. परंतु, टेंडरला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आजही नवीन प्रसाधनगृह बंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याबद्दल आगार व्यवस्थापक महेश भोये यांना जाब विचारला असता त्यांनी सोमवारपासून (दि.24) रोजी प्रसाधनगृह सुरू करत असल्याचे आश्वासन दिले. तसेच लवकरात लवकर दोन कनेक्शन करून पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, असेही आश्वासन दिले. मात्र जर पुढील आठवड्यात एस टी स्थानकातील दुरवस्था दूर झाली नाही तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहरप्रमुख अभिजीत सावंत यांनी यावेळी बोलताना दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT