ठाणे : गेले दोन दिवस जिल्ह्यात संततधार सुरूच असून श्रावणाच्या पहिल्या दिवशी 32. 3 मी. मी. पावसाची नोंद झालेली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पाऊस 43. 3 मी. मी हा अंबरनाथ तालुक्यात नोंदविला गेला. मे महिन्यापासून पाऊस पडत असतानाही ठाणे जिल्ह्यात आजमितीला फक्त 1124. 6 मी मी पाऊस पडला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत 298 मी. मी कमी पाऊस पडलेला आहे. गतवर्षी याच दिवसापर्यंत 1422. 5 मी. मी. एवढा पाऊस झाला होता. दरम्यान 26 जुलै 2005 च्या मुंबईतील महाप्रलयाला उद्या 20 वर्ष पूर्ण होतील.
ठाणे जिल्हात दिवसभर संततधार पाऊस पडत असला तरी फारसा जोर नव्हता. श्रावणी पाऊस सुरु होता. मात्र हवेत गारवा अधिक जाणवत होता. अधून मधून मोठ्या सरी पडत होता. त्यामुळे वाहतुकीवर फार परिणाम झाला नाही. श्रावणाच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी पावसाचा आनंद घेतला. आज दिवसभरात ठाणे तालुक्यात 29. 3 मी. मी पाऊस पडला. कल्याण तालुक्यात 39. 0 मी. मी , मुरबाड 26. 8 मी मी , भिवंडी 37. 4 मी मी, शहापूर 20. 4 मी मी , उल्हासनगर 40. 8 मी. मी , अंबरनाथ 43. 3 मी मी पाऊस पडला.
गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात 298 मी. मी कमी पाऊस झालेला आहे. 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत 944 मी. मी पाऊस पडल्याने महाप्रलय आला होता. अतिवृष्टीमुळे हाहाकार उडालेला होता. या घटनेला उद्या 20 वर्ष पूर्ण होत आहेत.