डोंबिवली : डोंबिवलीत किळसवाणा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. एका फळ विक्रेत्याकडून प्लास्टिकच्या पिशवीत लघुशंका करून त्याच हाताने फळे ग्राहकांना विकली जातात. या फळ विक्रेत्याचा लघुशंका करतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
या फळ विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार समोर आल्यानंतर डोंबिवलीकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. व्हायरल व्हिडिओनंतर मानपाडा पोलिसांनी तत्काळ फळविक्रेता अली खान याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी फळविक्रेत्या अली खानची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या किळसवाण्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. फेरीवाल्यांकडून कोणतीही खाण्याची वस्तू वा सामान घेताना काळजी घेण्यात यावी. विशेषतः अशा फळ विक्रेत्यांपासून सावधान राहण्याचा इशारा समाज माध्यमांवर नेटकर्यांनी दिला आहे.