अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी दोघांना अटक file photo
ठाणे

Thane Crime News | वसईत अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

नालासोपारा : वसईत स्नॅपचॅट सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल केल्याप्रकरणी वसई पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हॉट्सपवर शेअर करणार्‍या दोन महाविद्यालयीन तरुणांना वसई पोलिसांनी अटक केली आहे. 8 जुलै रोजी पीडितेच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

मुलीच्या वडिलांनी दावा केला आहे की त्यांच्या 16 वर्षांच्या मुलीचा एक अश्लील व्हिडिओ व्हॉट्सपवर फिरत होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरीत गुन्हा दाखल केला मात्र पोलिसांना संशयिताची ओळख पटू शकली नव्हती. त्यामुळे त्यांनी मीरा-भाईंदर, वसई-विरार सायबर सेलला मदतीसाठी पत्र लिहिले. सायबर सेलचे सुजितकुमार गुंजकर यांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने, व्हॉट्सपवर फिरणारा व्हिडिओ हा स्नॅपचॅट खात्यावरून तयार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार इयन डिमोंटी (19) याला 10 ऑगस्ट रोजी नालासोपारा येथील गासगाव येथून अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीत डिमोंटीने उघड केले की त्याच्याकडे अँड्रिच ऑस्कर फिगेर (19) हा गुन्ह्यात साथीदार होता आणि पोलिसांनी त्याला अटकही केली. त्याला दोघेही किशोर वयीन महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत आहेत. डीमोंटीची अल्पवयीन मुलीशी मैत्री झाल्याचे पोलिस तपासात समोर आले. आरोपीने पीडितेला तिच्याशी मैत्री पूर्ण संबंध ठेवायचे आहे, असे सांगून आमिष दाखवले होते. त्याने तिला कपडे उतरवण्यास सांगितल आणि त्याचा गुपचूप स्वतःचा चेहरा लपवून समोरील मुलीचा अश्लील व्हिडीओ स्क्रीन रेकॉर्ड करून व्हायरल केला. ही कथित घटना जूनमध्ये घडली होती.

इतरही व्हिडिओ बाबत तपास सुरू

डिमॉन्टीने स्क्रीन रेकॉर्ड करण्यासाठी दुसरा फोन वापरला आणि व्हॉट्सप ग्रुप्समध्ये अश्लील व्हिडिओ शेअर केला. आरोपींनी इतर पीडितांचे व्हिडिओ शेअर केले होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. अल्पवयीन मुलीच्या वडिलांना त्याच्या मित्राने व्हॉट्सप ग्रुपवर फिरत असलेल्या व्हिडिओबद्दल माहीती दिली. त्यानंतर वडिलांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करून 2 आरोपींना अटक केली आहे. सदर पीडितेचा व्हिडीओ शेअर करून आरोपींना काही आर्थिक फायदा झाला का आणि यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारे काही कृत्य केले आहे का, याचा तपास आता पोलिस करणार आहेत. भारतीय दंड संहिताच्या कलम 354 (महिलेच्या विनयभंग) अन्वये आणि पोक्सो कायदा 2012 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला वसई न्यायालयात हजर केले असता 11 तारखेला एक दिवसाची कोठडी सुनावली होती, आज पुन्हा वसई कोर्टात हजर केले असता वसई न्यायालयाने 2 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT