ठाणे

Thane Crime News | चक्क मगरीच्या पिल्लांची विक्री

मगरीच्या पिल्लांची विक्री; पवईतील प्रकार, आरोपीला 12 जुलैपर्यंत वनकोठडी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : मुंबई उपनगरातील आयआयटी पवई येथील जोगेश्वरी लिंक रोडवर मगरीचे पिल्लू विकणार्‍या तरुणास वनविभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. यश आनंद पारगावरकर (21) असे या तरुणाचे नाव आहे. त्याला न्यायालयात नेले असता 12 जुलैपर्यंत वनकोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

उपवनसंरक्षक ठाणे संतोष सस्ते यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम हा मगरीचे पिल्लू विक्रीसाठी मुंबई उपनगरातील आयआयटी पवई गेट समोर असलेल्या जोगेश्वरी लिंक रोडवर येणार असल्याच्या माहिती नुसार वनविभागाने पथक निर्माण करून सापळा रचला. यात ठाणे उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वनक्षेत्रपाल राकेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली मानद वन्यजीव रक्षक ठाणे रोहित मोहिते, वनपाल संदीप यमगर, वनरक्षक मिताली महाले आणि राम बालाजी केंद्रे यांचा समावेश होता.

पथकाने जोगेश्वरी लिंक रोडवर सापळा रचून मगरीच्या पिल्लासह यश पारगावरकर (21) रा. राज रत्न चाळ म.ज्योतीबा फुले नगर, आयआयटी, मुंबई याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात मुलुंड परिमंडळात वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात नेले असता पारगावरकर याला शुक्रवार 12 जुलैपर्यंत वनकोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वन्य प्राणी आणि वन्यजीव हे वन्य संरक्षण अधिनियमाच्या अधिसुची-1 मध्ये मोडते. या गुन्ह्यात जास्तीत जास्त 7 वर्षाच्या शिक्षेची आणि 25 हजाराच्या दंडाची तरतूद असल्लची माहिती वनक्षेत्रपाल राकेश भोईर यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT