एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई pudhari news network
ठाणे

Thane Crime News | कुख्यात गुंड राजकुमार गुप्ता स्थानबद्ध

MPDA : एमपीडीए अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

वसई : नालासोपारा येथील कुख्यात गुंड राजकुमार गुप्ता उर्फ राजू बैल याच्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करून तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले. 2024 या वर्षातील स्थानबद्ध करण्याची तुळींज पोलीस ठाण्याची पहिली आणि आयुक्तालयातील ही तिसरी कारवाई आहे. ('MPDA' (Maharashtra Prevention of Dangerous Activities))

नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव येथे राहणारा राजकुमार लालचंद गुप्ता उर्फ लालू बैल (36) याच्या विरोधात नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्यात अमली पदार्थांची तस्करी, मारामारी, शस्त्र बाळणे आदी विविध गुन्ह्यात 13 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची या परिसरात दहशत होती. फेब्रुवीर 2021 मध्ये मोरेगाव नाका येथे पूर्ववैमनस्यातून 3 जणांनी तलवारीने हल्ला करून 5 राऊंड गोळीबार केला होता. या हल्ल्यात गुप्ता जखमी झाला होता. त्याच्या डोक्यात गोळी लागल्याने तो काही महिने रुग्णालयात कोमा मध्ये होता. रुग्णालयातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कृत्य सुरू केले होते. त्याला पोलिसांनी हद्दपारही केले होते. मात्र तरी देखील त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरू होती. त्याच्याविरोधात पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याअन्वये (एमपीडीए) स्थानबद्ध करण्याची तयारी सुरू केली.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला अटक करून त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली आहे. परिमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले- श्रींगी यांच्या आदेशनुसार अनिल शिंदे, आकाश वाघ आदी पोलीस कर्मचार्‍यांनी ही प्रक्रिया पार पाडली. या आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद तावडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT