वसई तालुक्यातील नायगावच्या टीवरी भागात असलेल्या ऑक्सिस बँकेचे एटीएम चोरट्यांकडून गॅस कटरच्या साहाय्याने फोडण्यात आले. pudhari news network
ठाणे

Thane Crime News | गॅस कटरने एटीएम फोडून लाखोंची रोकड लंपास

Thane Vasai : गॅस कटरने एटीएम फोडले नायगाव परिसरातील घटना; पोलिसांचा तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : वसई तालुक्यातील नायगावच्या टीवरी भागात असलेल्या एका इमारतीच्या तळमजल्यावरील ऑक्सिस बँकेचे ए टी एम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून त्यातील चार लाखांहून अधिक रोकड चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली असून याबाबत नायगाव पोलीसांनी तपास सुरू केला आहे.

नायगाव पूर्वेच्या टीवरी राजावळी रस्त्यालगत अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले आहे. बुधवारी (दि.२४) रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली यात चोरट्यांनी 4 लाख 30 हजारांची रोकड लंपास केली आहे. नायगाव पूर्वेच्या टीवरी राजावळी रस्त्यालगत नवकार फेज थ्री इमारत आहे. या इमारतीत अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. बुधवारी (दि.२४) रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम मध्ये प्रवेश करून गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम फोडले. यातील चार लाख 29 हजार 700 इतकी रोकड लंपास केली आहे.

नायगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. एटीएम फोडताना त्या ठिकाणी दोन व्यक्ती असल्याचे समजले आहे मात्र आणखीन त्याचे साथीदार सोबत असण्याची शक्यता आहे त्याचा ही तपास सुरू असल्याची माहिती नायगाव पोलिसांनी दिली आहे. यापूर्वी सुद्धा वसई विरार परिसरात एटीएम फोडीच्या घटना घडल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT