मिरा रोड : मिरा रोड परीसरात राहणार्या अल्पवयीन मुलीला बनावट इंन्टाग्राम आयडीवरुन अश्लील मेसेज व फोटो पाठवुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्या आरोपीला मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंकलेश्वर, गुजरात येथुन अटक केली आहे.
मिरा रोड येथे राहणार्या अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर नोव्हेंबर 2024 चे शेवटचे आठवड्यात एका इंस्टाग्राम आयडीवरुन अश्लील फोटो व मेसेज पाठवले होते. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून मिरा रोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांसह माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम तसेच बालकांचे लैगींक अपराधापासून संरक्षण अधिनियमा अंतर्गत 2 डिसेंबर रोजी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचे अनुषंगाने तांत्रीक विश्लेषण केले असता फोटो व मेसेज पाठवलेले इंस्टाग्राम आयडी हा दिप विजयभाई सोळंकी (20) , रा. बिपीन पारीख सोसायटी, गळखोळ पाटीया, अंकलेश्वर, गुजरात याचा असल्याची माहीती प्राप्त झाली. त्यानंतर पोनि राहुल राख यांनी याबाबत पडताळणी व पुढील तपास करण्यासाठी वरीष्ठांच्या परवानगीने पोहवा हनुमंत सुर्यवंशी, राजवीर सिंग बोधासिंग संधु, अनिल रामदास नागरे या पोलीस पथकास अंकलेश्वर, गुजरात येथे रवाना केले. या पथकाने स्थानिक पोलीस ठाण्याचे मदतीने आरोपीस 5 डिसेंबर रोजी सायंकाळी ताब्यात घेतले.