बदलापूर : बदलापुरात एका नराधमाने त्याच्या मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच ही बाब पतीला सांगितल्यास तुला जीवे मारून टाकू, अशी धमकी या व्यक्तीने महिलेला दिली होती. मात्र हे वारंवार घडू लागल्यानंतर पत्नीने पतीला याबाबतची माहिती दिली.
यानंतर पतीने त्याच्या मित्रालाच संपवल्याचा खळबळजनक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपीने मित्राच्या डोक्यात हातोडी घालून त्याची हत्या केली. तसेच बाथरूममध्ये पडून सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा बनाव या दोघांनी रचल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये या सगळ्याची पोलखोल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
बदलापूर पुर्वेकडील शिरगांव परिसरात राहणाऱ्या नरेश आणि सुशांत यांची चांगली मैत्री होती. मात्र सुशांत याने नरेशच्या पत्नीवर अतिप्रसंग केल्याचे पतीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी तिला दिली. यानंतर आणखी काही वेळा त्याने तिला धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला. मात्र पत्नीने हिंमत करून नरेशला सुशांतच्या या दुष्कृत्याची माहिती दिली. यानंतर नरेशने आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचे दाखवत १० जानेवारी रोजी सुशांतला घरी बोलावले. तिथे दुपारी या दोघांनी मद्यपान केले. त्या रात्री सुशांत हा नरेशच्याच घरी मुक्कामी राहिला. पहाटेच्या सुमारास नरेश याने सुशांतच्या डोक्यात हातोडी मारून त्याची हत्या केली आणि अति दारू प्यायल्याने बाथरूममध्ये पडून सुशांतच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला, असा बनाव रचत पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र जेव्हा सुशांतच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले, त्यावेळेस नरेश याची पोलखोल झाली. कारण सुशांतचा मृत्यू अवजड वस्तूने डोक्यात प्रहार केल्यामुळे झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले.
पहाटेच्या सुमारास नरेश याने सुशांतच्या डोक्यात हातोडी मारून त्याची हत्या केली आणि अति दारू प्यायल्याने बाथरूममध्ये पडून सुशांतच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला, असा बनाव रचत पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र जेव्हा सुशांतच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले, त्यावेळेस नरेश याची पोलखोल झाली. कारण सुशांतचा मृत्यू अवजड वस्तूने डोक्यात प्रहार केल्यामुळे झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले.