कसारा : कसारा जवळील वाशाळा गावं च्या हद्धीत बेकायदेशीररित्या गुटख्याची तस्करी करणाऱ्या तीन वाहन चालकांना त्यांच्या वाहनांसह कसारा पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला.
रविवारी रात्री अकरा च्या सुमारास कसारा पासून जवळ असलेल्या वाशाळा गावच्या हत एक आयषर टेम्पो क्रमांक एम एच १८बी झेड ३१९२ या वाहनातून पिकअप टेम्पो एम एच ०४एम एच १०५८ व टेम्पो क्रमांक एम एच ४८सि क्यु २९७४ या वाहनांत गुटखा भरत असताना अचानक वाशाळा गावातील तरुण तिथे पोहचले. संशय वाटला म्हणून स्थानिक तरुणांनी विचारणा केली असता वाहन चालकांनी उद्धट उत्तरे दिली. हा संशयस्पद प्रकार तरुणांनी कसारा पोलिसांना कळवला कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावित यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम, पोलीस हवालदार झोंबाड, पोलीस हवालदार विनोद खादे यांनी घटनास्थळी धाव घेत ४,६१,७००रुपये किमतीचा गुटखा व तीन वाहने जप्त करून कसारा पोलीस ठाण्यात आणले.
याप्रकरणी कसारा पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अर्षद सादिक सय्यद यांनी केलेल्या पंचनामा नुसार व तक्रारी नुसार आरोपी १] विक्रम सिंग परमेश्वर सिंग वय 27 वर्ष धंदा - चालक रा- चिंचोली नायगाव पुर्व 2) कैन्हय्यालाल गुलाब राम यादव वय 25 वर्ष धंदा - चालक रा - राजवली रोड गोशाळा आश्रम भोईवापाडा वसई पालघर यांच्यावर गुन्हा नोंद क्रमांक व कलम- 220/2026 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 123,274,275,223, सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम प्रमाणे.गुन्हा दाखल केला असून या प्रकरणातील एका वाहनाचा चालक फरार झाला आहे..