ठाणे : ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील परिसरात अमली पदार्थ विक्री आणि तस्करी करणार्याच्या विरोधात कारवाई करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथकाने लावलेल्या सापळ्यात आरोपी सुमित कुमावत (21) याला अटक करून घेतलेल्या झडतीत हा अमली पदार्थाचा साठा पोलिसांच्या हाताला लागला. त्यांची किंमत 2 कोटी 38 लाख 87 हजार 950 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये 2.37 कोटीचा 2 किलो 374 ग्राम हायब्रीड गांजा विडस आणि 19 चऊच- / एउडढ-डधच्या विदेशी गोळ्या हस्तगत करण्यात आल्या.
अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी विशेष मोहिम राबविली होती. या मोहिमेतील पो.हवा. अमोल देसाई यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांचे परवानगीने सापळा रचून कारवाई केली असता 24 ऑगस्ट रोजी रात्रौच्या सुमारास आरोपी सुमित कुमावत (21) रा. ठि. बोरिवली, मुंबई मुळ रा. जैसलमेर, राजस्थान याच्या ताब्यात 2 कोटी 37 लाख 40 हजार रुपये किंमतीचा 2 किलो 374 ग्रॅम वजनाचा गांजा व 1 लाखा 47 हजार रुपयांच्या 19 मेथेलिन डायऑक्सि मेथमफेन्टामाईन या टॅबलेट्स हा अमली पदार्थ असा एकूण 2 कोटी 38 लाख, 87 हजार किमतीचा मुद्देमाल विक्रीकरीता आणल्याचे समोर आले. पथकाने कारवाई करत दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आहे.
4 सप्टेंबरर्यंत पोलीस कस्टडी
अटक आरोपींच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी सुमित कुमावत याला न्यायालयात नेले असता त्याला न्यायालयाने 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि/राजेंद्र निकम, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे हे करीत आहे.
ठाणे पोलिसांचे ठाणेकरांना आवाहन
अमली पदार्थ विक्री, साठवणूक, वाहतूक, सेवन करणे हा अपराध असून यामध्ये सहभागी असलेल्या इसमांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध असल्यास अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर येथे द्यावी. माहिती देणारे इसमांची नावे गुप्त ठेवली जातील.